शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 23:57 IST

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठळक मुद्देया घटनेत मृतदेह तलावात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतू गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होण्यापुर्वीच तो उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

डोंबिवली:  पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पानटपरी चालकाने दोन कामगारांच्या मदतीने अन्य एका कामगाराची हत्या केल्याची घटना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी शिताफीने केलेल्या तपासात समोर आली आहे. पानटपरी चालक सुनिल श्रीराजबा पटेल (वय 28) याला अटक करून मानपाडा पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. या घटनेत मृतदेह तलावात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतू गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होण्यापुर्वीच तो उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

कल्याण-शीळ मार्गावरील मानपाडा हद्दीतील क्लासिक हॉटेलचे पानटपरीमधील काम करणा-या कामगारांची दोन ते चार दिवसांपुर्वी भांडणे झालेली आहेत आणि या भांडणात एकाला जीवे मारण्यात आल्याची माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक राजेंद्र खिल्लारे यांना गुप्त बातमीदारामार्फत गुरूवारी मिळाली. या माहीतीनुसार वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे यांसह अन्य पोलीसांनी संबंधित कामगार राहत असलेल्या ललित काटयाजवळील पांडुरंग वङो कम्पाऊंड या ठिकाणी धाड टाकून पानटपरी चालक सुनिल पटेल याला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने दोन कामगारांच्या मदतीने कामगार सुरीज स्वरूपवा पाल (वय 18) याची हत्या केल्याची कबुली दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत सुरीज हा सुनिलकडे कामासाठी आला होता. दरम्यान पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून सुरीजशी सुनिलचा वाद झाला होता. मागील शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3.30 च्या कालावधीत झालेल्या वादात सुनिलने इतर दोन कामगारांच्या मदतीने लाकडी दांडका, गॅसचा पाईप व कमरेचा पट्टा याने सुरीजला बेदम मारहाण केली आणि त्याचे डोके जमिनीवर आणि भिंतीवर जोरदार आपटले. यात सुरीजचा जागीच मृत्यू झाला. सुनिलला पोलीसांनी अटक केली असून अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची भुमिका बजावणा-या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक खिल्लारे यांचे पानसरेंच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. दरम्यान या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुरीजची हत्या 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली. परंतू मृतदेहासह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोणीत भरून क्लासीक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दलदलयुक्त तलावात आरोपींकडून टाकण्यात आला होता. पोलीस तपासात हत्येचा गुन्हा उघडकीस येताच सुरीजचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

 

सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात 

crime

टॅग्स :RobberyचोरीMurderखूनPoliceपोलिसArrestअटकdombivaliडोंबिवली