मेट्रोच्या कामादरम्यान गर्डर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:43 IST2019-11-01T21:40:58+5:302019-11-01T21:43:14+5:30
समता नगर पोलीस ठाण्यानजीक ही दुर्घटना घडली.

मेट्रोच्या कामादरम्यान गर्डर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
मुंबई - मुंबईतील दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोनसाठी ट्रेलरवरून नेण्यात येणारा गर्डर अंगावर पडल्याने २५ वर्षीय वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज घडली. समता नगर पोलीस ठाण्यानजीक ही दुर्घटना घडली.
दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन - अ प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजनाच गर्डर नेला जात होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे पहाटेच्या सुमारास समता नगर पोलीस ठाण्यानजीक ट्रेलरची जोडणी काही तांत्रिक बिघाडामुळे तुटल्याने गर्डर मागील वाहनावर कोसळला. त्यात वाहनचालक अरमान अहमद याचा मृत्यू झाला. अरमान अहमद हा मेसर्स जे. कुमार या कंपनीसाठी काम करत होता. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.