येरवड्यात सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; पाच महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:06 PM2020-05-22T13:06:45+5:302020-05-22T13:08:32+5:30

पुणे : सराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की वमारहाण ...

Women was hitting to police who went to caught the criminal in yerwada | येरवड्यात सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; पाच महिलांवर गुन्हा दाखल

येरवड्यात सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; पाच महिलांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती

पुणे : सराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की वमारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडापोलिसांनीमहिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई सागर कोतवाल यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील निळा झेंडा चौकात बुधवारी दुपारी २ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार दादा ऊर्फ विनोद पोपट कांबळे हा हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाल हेत्यांच्या इतर सहकाऱ्यांसह निळा झेंडा चौकात गेले होते. पोलिसांना पाहून कांबळे हा एका घरात पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पोलीसही त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले. तेव्हा पाच महिलांनी पांलिसांना घरात जाण्यास प्रतिबंध केला. त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यानंतरही त्या पोलिसांची वाट अडवून त्यांच्या अंगावर धावून गेल्या. उलट पोलिसांना त्यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले व न गेल्यास नोकरी घालविण्याची धमकी दिली. या महिलांनी पोलिसांना धक्काबुक्की करून हातावर दगड मारून कोतवाल यांना अडविले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल या पाच महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Women was hitting to police who went to caught the criminal in yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.