महिलेने मेहंदीने हातावर लिहिली लग्नाची तारीख आणि खाल्लं विष; वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:59 IST2023-01-18T12:59:42+5:302023-01-18T12:59:54+5:30

MP Crime News : जयाचा भाऊ प्रिंसने सांगितलं की, जया यादव आणि आयुष गोयल यांचं 8 महिन्यांआधी लग्न झालं होतं. जयाने आयुषसोबत लव्ह मॅरेज केलं होतं.

Women try to suicide in ujjain MP after fight with husband | महिलेने मेहंदीने हातावर लिहिली लग्नाची तारीख आणि खाल्लं विष; वाचा काय आहे प्रकरण

महिलेने मेहंदीने हातावर लिहिली लग्नाची तारीख आणि खाल्लं विष; वाचा काय आहे प्रकरण

MP Crime News : मध्‍य प्रदेशच्या उज्जैनमधील रामीनगरमधून एक धक्कादायक घटना समोरर आली आहे. भाड्याच्या घरात पतीसोबत राहणाऱ्या महिलेने वादानंतर विष खाल्लं आणि रेल्वेखाली येण्यासाठी गोपालपुरा येथील रेल्वे रूळावर पोहोचली. तिचा मानलेला भाऊ प्रिंसने तिला गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. जया नावाच्या या महिलेने तिच्या हातावर मेहंदीने लग्नाची तारीख लिहिल्यावर 16 जानेवारी 23 ही तारीख लिहिली. त्यानंतर विष खाल्लं. सध्या महिला जबाब देण्याच्या स्थितीत नाही. 

जयाचा भाऊ प्रिंसने सांगितलं की, जया यादव आणि आयुष गोयल यांचं 8 महिन्यांआधी लग्न झालं होतं. जयाने आयुषसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. प्रिंसने सांगितलं की, जयाचा पती मंदिरात पुजारी होता. दोघांमध्ये अलिकडे बराच वाद होत होता. जयाने पती आयुषला मोबाइलवर व्हाइस मेसेज केला होता. यात ती म्हणाली होती की, मला भेटायला ये नाही तर मी जीव देईन. आयुषने यावर काहीच उत्तर दिलं नाही. यानंतर जयाने हातावर मेहंदीने लग्नाची तारीख लिहिली आणि त्यानंतर 16 जानेवारी 23 ही तारीख लिहून तिने विष खाल्लं.

प्रिंसने पुढे सांगितलं की, जशी त्याला घटनेची माहिती मिळाली तो शेजारी मित्रासोबत रेल्वे रूळाजवळ पोहोचला. त्याने गंभीर स्थितीत जयाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता पोलीस जयाच्या जबाबाची वाट बघत आहेत. सध्या ती बोलू शकत नाही. तिच्या जबाबानंतरच पोलीस पुढील कारवाई करतील.

अॅडिशनल एसपींनी सांगितलं की, माधव नगर पोलीस स्टेशनला हॉस्पिटलकडून एक महिलेने विष खाल्ल्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की, महिला जबाब देण्याच्या स्थितीत नाही.  पोलिसांनी सांगितलं की, महिला आणि तिचे कुटुंबिय बोलण्याच्या स्थितीत असतील तेव्हा त्यांचा जबाब घेतला जाईल. 

Web Title: Women try to suicide in ujjain MP after fight with husband