थंडपेयामधून गुंगीचे औषधे देऊन महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:00 IST2019-09-24T13:00:02+5:302019-09-24T13:00:38+5:30
महिलेला गुंगी आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र तिच्या पर्समधून काढून घेतले...

थंडपेयामधून गुंगीचे औषधे देऊन महिलेवर अत्याचार
पिंपरी : महिलेला विविध ठिकाणी बोलावून तिला गुंगीचे औषध मिसळून कोल्डड्रिंक पिण्यास दिले. त्यानंतर महिलेच्या पर्समधून ओळखपत्र काढून हॉटेलवर नेले. तिथे तिला तेच पेय पिण्यास दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना औंध येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठाकुर उर्फ फौजी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकुर याने फिर्यादी यांना फोन करून आकुर्डी रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर शिवाजीनगर येथे बोलावून गाडीमध्ये बसण्यास सांगितले. गाडीमध्ये बसल्यावर फिर्यादीला गुंगीचे औषध मिसळलले कोल्डड्रिंक प्यायला दिले. महिलेला गुंगी आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र तिच्या पर्समधून काढून घेतले. औंध येथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण करताना पुन्हा तेच कोल्डड्रिंक दिले. त्यानंतर महिलेला चक्कर आल्यावर तिला रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादी यांना शुद्ध आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यावेळी याबद्दल कुणाला काही सांगितले तर तुझ्या मुलांचे काय होईल ? अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.