Video : महिलेची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद; पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:07 IST2018-11-02T16:05:40+5:302018-11-02T16:07:06+5:30

सुरुवातीलाच तिने अंगठ्या पाहण्यासाठी घेतल्या आणि त्यातील काही अंगठ्या हातचलाखीने उजव्या हातात लपवल्या. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने  या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

Woman's handcuffed CCTV footage; Police arrested | Video : महिलेची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद; पोलिसांनी केली अटक 

Video : महिलेची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद; पोलिसांनी केली अटक 

मुंबई - घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफाकडे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन हातचलाखी करून सोनं चोरणाऱ्या महिलेला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिला एका सराफाकडे अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आली होती. सुरुवातीलाच तिने अंगठ्या पाहण्यासाठी घेतल्या आणि त्यातील काही अंगठ्या हातचलाखीने उजव्या हातात लपवल्या. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने  या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

आपल्यासोबत एका लहान मुलाला घेऊन आरोपी महिला घाटकोपरच्या एका सराफाच्या दुकानात आली होती. सराफाच्या दुकानातील कामगारांची नजर चुकवून तिने हातचलाखी केली आणि सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. मात्र दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाली होती. संध्याकाळी सराफाने हिशेब केला. त्यावेळी सोन्याच्या अंगठ्या कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सीसीटीव्ही तपासणी केल्यावर महिलेने अंगठ्या चोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.  

Web Title: Woman's handcuffed CCTV footage; Police arrested