खळबळजनक! झाडाला अटकलेल्या स्थितीत आढळला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:47 IST2021-08-22T17:45:20+5:302021-08-22T17:47:08+5:30
Deadbody Found : या महिलेने आत्महत्या केली की नहरात बुडाली, याचा तपास केला जात आहे.

खळबळजनक! झाडाला अटकलेल्या स्थितीत आढळला महिलेचा मृतदेह
सावली (चंद्रपूर) : तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील पालेबारसा येथील गोसेखूर्द नहरात महिलेचा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास आढळून आला. निर्मला बालाजी नेवारे (४५) असे मृत महिलेचे नाव असून ती ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर (पाथडी) येथील रहिवासी आहे.
ही महिला नहराच्या पाण्यात वाहून आली असून पाथरी परिसरातील नहरात झाडाला अटकलेल्या स्थितीत तिचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. या महिलेने आत्महत्या केली की नहरात बुडाली, याचा तपास केला जात आहे.
जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारhttps://t.co/hdYgkngK2L
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2021