महिलेची ओढणीने गळा आवळून केली हत्या अन् लुटले घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:35 IST2019-10-08T16:29:14+5:302019-10-08T16:35:54+5:30

अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

The woman was strangled to death and robbed | महिलेची ओढणीने गळा आवळून केली हत्या अन् लुटले घर 

महिलेची ओढणीने गळा आवळून केली हत्या अन् लुटले घर 

ठळक मुद्देयाप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मृत कंचन यांच्या गळ्यातील सोनसाखळी,कर्णफुलं आणि कपाटातील रोख रक्कम १ लाख ५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.

मुंबई - मालाड मालवणी येथे महिलेची हत्या करून अज्ञात चोरट्यांनी तिचे घर देखील लुटले आहे. कंचन प्रमोद गुप्ता (४७) असं या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

मालाड येथील मालवणी परिसरातील कलेक्टर कंपाउंड येथे राहणाऱ्या कंचन गुप्ता यांची सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने गळा आवळून जीवे ठार मारून हत्या केली. तसेच मृत कंचन यांच्या गळ्यातील सोनसाखळी,कर्णफुलं आणि कपाटातील रोख रक्कम १ लाख ५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२, ३९७ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

Web Title: The woman was strangled to death and robbed