महिलेची घरात घुसून सपासप वार करून केली हत्या, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 18:46 IST2021-03-21T18:45:36+5:302021-03-21T18:46:00+5:30

Murder Case : विठ्ठलवाडी पोलिसांनी संशयावरून एकाला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

A woman was stabbed to death in a house, one arrested | महिलेची घरात घुसून सपासप वार करून केली हत्या, एकाला अटक

महिलेची घरात घुसून सपासप वार करून केली हत्या, एकाला अटक

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४, २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय विद्या तलरेजा यांचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदानंद नाईक


उल्हासनगर : कँम्प नं-४, २६ सेक्शन येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी संशयावरून एकाला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-४, २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय विद्या तलरेजा यांचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी तपासाचे चक्र जलद फिरवून एका २० वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली. मृत महिला ही पती, मुलां सोबत राहत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A woman was stabbed to death in a house, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.