खळबळजनक! हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलेची भोसकून हत्या, पतीच्या सांगण्यावरून आली होती पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:00 IST2022-01-10T20:00:00+5:302022-01-10T20:00:02+5:30
Murder Case :गेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका तिच्या बहिणीसोबत बुराडी येथे राहत होती. अर्जुनने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रियांकाला फोन करून खोडा कॉलनीतील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

खळबळजनक! हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलेची भोसकून हत्या, पतीच्या सांगण्यावरून आली होती पत्नी
गाझियाबादमधील खोडा येथील आदर्श नगर येथील ALX हॉटेलमध्ये सोमवारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, जी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. हॉटेलमध्ये महिलेचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बुराडी येथील रहिवासी असलेल्या प्रियंका (27) हिची हॉटेल एएलएक्सच्या रूम नंबर-107 च्या बाथरूममध्ये भोसकून हत्या करण्यात आली. प्रियांकाची बहीण चंचल सांगते की, प्रियांकाचे लग्न अडीच वर्षांपूर्वी हापूडच्या गढीत राहणाऱ्या अर्जुनसोबत झाले होते. तेव्हापासून सासरचे लोक प्रियांकाला हुंड्याची मागणी करत मारहाण करत होते.
लव्ह मॅरेजला विरोध असणाऱ्या भावाने बहिणीचे कपाळ केले पांढरे, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाण
गेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका तिच्या बहिणीसोबत बुराडी येथे राहत होती. अर्जुनने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रियांकाला फोन करून खोडा कॉलनीतील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. पती अर्जुनने प्रियांकाची बाथरूममध्ये वार करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच खोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. खोडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.