बापरे! प्रियकर भांडण करत नाही म्हणून प्रेयसीनं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल; पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:21 PM2020-07-20T12:21:02+5:302020-07-20T12:21:49+5:30

माहितीनुसार, हे जोडपे खूप काळापासून या परिसरात राहते, नेहमी महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असे असं शेजाऱ्यांनी सांगितले. या महिलेचा प्रियकर खूप शांत स्वभावाचा होता

Woman tried killing boyfriend as he never used to fight with girlfriend | बापरे! प्रियकर भांडण करत नाही म्हणून प्रेयसीनं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल; पोलीसही हैराण

बापरे! प्रियकर भांडण करत नाही म्हणून प्रेयसीनं जे केलं ते ऐकून धक्काच बसेल; पोलीसही हैराण

Next

प्रेमीयुगलांमध्ये प्रेमासोबत कधीकधी भांडण होत असतं, भांडणातूनच प्रेम टिकून राहतं असं मानलं जातं. काही वेळा तर प्रेमीयुगलांमध्ये सतत होणाऱ्या भांडणामुळे अनेकदा ब्रेकअपच्या घटना घडतात. तुम्हाला असं वाटतं का की, प्रेमात भांडण होत नसेल तर ते प्रेमीयुगल आनंदी राहतात. पण काही ठिकाणी भांडण होत नाही म्हणून नाती तोडली जातात. टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं कृत्य ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

याठिकाणी एका महिलेने स्वत:च्या प्रियकराला गोळी मारली कारण तो कधीही तिच्यासोबत भांडत नव्हता. प्रियकराला गोळी मारुन ही प्रेयसी फरार झाली, तिचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे. पोलीस लुइसियाना येथे राहणाऱ्या २९ वर्षीय जेलिशा लॉरेन्सचा शोध घेत आहेत. तिच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. महिलेने तिच्या प्रियकराच्या डोक्यावर गोळी झाडली आणि ती पळून गेली.

या महिलेवर हत्येचा आरोप आहे. असं सांगितलं जात आहे की, १८ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता महिलेने तिच्या प्रियकराला गोळ्या घातल्या. गोळीबार ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तेथे एका ३४ वर्षीय व्यक्तीला जखमी अवस्थेत पाहिले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

माहितीनुसार, हे जोडपे खूप काळापासून या परिसरात राहते, नेहमी महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असे असं शेजाऱ्यांनी सांगितले. या महिलेचा प्रियकर खूप शांत स्वभावाचा होता, महिला ओरडली तरीही तो उलट उत्तर देत नव्हता. तो प्रेयसीचं भांडत नव्हता म्हणून महिला त्याच्यासोबत सारखी भांडण करत असे. वारंवार भांडण करुनही प्रियकर तिच्याशी भांडत नव्हता म्हणून अखेर चिडून तिने प्रियकराच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर या महिलेने तिथून पळ काढला, सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...

 ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार

आजपासून ग्राहकांना मिळणार 'हे' नवीन अधिकार; दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार

प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

Web Title: Woman tried killing boyfriend as he never used to fight with girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.