Ex-Boyfriend ने बसमध्ये तरूणीने ३० वेळा चाकूने केला सपासप वार, पण कुणी केली नाही मदत..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:11 IST2021-02-23T16:05:28+5:302021-02-23T16:11:35+5:30
मेक्सिकोच्या सिनालोआ(Sinaloa) मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डवर बसमध्ये ३० वेळा सपासप वार केलेत. पण बसमधील कुणीही तिची मदत केली नाही.

Ex-Boyfriend ने बसमध्ये तरूणीने ३० वेळा चाकूने केला सपासप वार, पण कुणी केली नाही मदत..
मेक्सिकोच्या सिनालोआ शहरा ३३ वर्षीय महिलेला भेटण्यासाठी तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड पोहोचला आणि त्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. या व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डवर चाकूने ३० वेळा सपासप वार केले. महिलेवर हल्ला झाला तेव्हा बसमध्ये बरीच गर्दी गोती. पण कुणीही तिच्या मदतीसाठी समोर आलं नाही. तर हल्ल्यादरम्यान महिला ओरडत राहिली होती आणि ती लोकांना मदतीसाठी विनंती करत होती.
महिलेवर चाकून ३० वेळा सपासप वार करूनही सुदैवाने महिलेचा जीव वाचला. थंडीमुळे महिलेने जाड विंटर जॅकेट घातलं होतं आणि हल्ला झाला तेव्हा महिलाच्या कोणत्याही महत्वपूर्ण अवयवाला जास्त इजा झाली नाही. हल्ल्यात महिलेचे हात आणि पाय गंभीर जखमी झाले आहेत. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : Girlfriend ने बॉयफ्रेन्डवर चाकू अन् हातोड्याने केला जीवघेणा हल्ला, कारण वाचून चक्रावून जाल...)
द सनच्या रिपोर्टनुसार, ही घटना १५ फेब्रुवारीची आहे. आता सीसीटीव्ह फुटेज जारी करण्यात आलं आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर व्यक्ती फरार होण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. रिपोर्टनुसार, त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याने स्वत:ला मारण्याचाही प्रयत्न केला होता.