बनावट सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून महिलेला लुबाडले

By राजकुमार जोंधळे | Updated: February 29, 2024 19:45 IST2024-02-29T19:44:43+5:302024-02-29T19:45:04+5:30

अहमदपुरात दिवसाढवळ्या घडली घटना 

Woman robbed for giving fake gold biscuits | बनावट सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून महिलेला लुबाडले

बनावट सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून महिलेला लुबाडले

लातूर : बनावट बिस्कीट देत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने  लुबाडल्याची घटना अहमदपूर शहरातील अंबाजोगाई रोडवर ईदगाह मैदाननजीक गुरुवारी दिवसाढवळ्या घडली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, पारुबाई दगडू बोराले (रा. हगदळ ता. अहमदपूर) या अहमदपूर शहरातील अंबाजोगाई रोडवर ईदगाह मैदाननजीक आल्या असता दुचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी तुम्हाला सोन्याचे बिस्कीट देतो, त्याबदल्यात गळ्यातील सोन्याचे दागिने द्या असे म्हणत आमिष दाखविले. त्यानंतर गळ्यातील जवळपास ४२ हजारांचे दागिने घेऊन पसार होत फसवणूक केली. 

याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दोघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Woman robbed for giving fake gold biscuits