पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 21:25 IST2019-03-11T21:22:42+5:302019-03-11T21:25:44+5:30
याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत.

पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या
मुंबई - पबमध्ये २६ वर्षीय विवाहित महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुजरातमधल्या चार व्यावसायिकांना अटक केली. या चौघांनी महिलेच्या पतीला देखील मारहाण केली. जुहू तारा रोडावर बोरा बोरा पबमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीडित महिला जोगेश्वरी येथे रहायाला असून ती पती आणि आणखी एका मित्रासोबत पार्टी करण्यासाठी पबमध्ये आली होती. आरोपींनी आपल्याला पाहून अश्लील हावभाव केले तसेच अश्लील स्पर्श केला असे महिलेने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा महिलेच्या नवऱ्याने हस्तक्षेप केला तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली. अक्षय राज, राहुल सिन्हा, अरुणसिंह गोहील आणि विराज सिंह हे मुंबईत एका बिझनेस ट्रीपसाठी आले होते. चारही आरोप ३० ते ३५ वयोगटातील आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यानंतर पोलीस पबमध्ये पोहोचले. चारही आरोपी गुजरातमधील आहेत अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली.