शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! LIC मधील गैरप्रकार पकडल्याने मॅनेजरला पेट्रोल टाकून जाळलं; 'त्या' एका कॉलने पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:14 IST

LIC कार्यालयात डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीत वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

तमिळनाडू पोलिसांनी मदुरै येथील LIC कार्यालयात डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीत वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या मृत्यूला पोलिसांनी आता 'हत्या' ठरवलं असून, मृत अधिकारी कल्याणी नांबी (५४) यांना पेट्रोल ओतून जाळल्याच्या आरोपाखाली त्यांचा सहकारी टी. राम याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला ही घटना एसीच्या शॉर्ट-सर्किटमुळे झालेला एक अपघात असल्याचं मानलं जात होत.

केबिनमध्ये पेट्रोल टाकून लावली आग

तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी रामने कल्याणी नांबी यांच्या केबिनमध्ये पेट्रोल ओतलं आणि आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी यांनी विमा दाव्यांच्या सेटलमेंटमध्ये सुरू असलेले गैरप्रकार आणि अनियमितता उघडकीस आणली होती. त्या राम विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईची शिफारस करणार होत्या. याच रागातून आरोपीने हे टोकाचं पाऊल उचललं. कल्याणी नांबी यांची काही दिवसांपूर्वीच तिरुनेलवेली येथून मदुरै येथे बदली झाली होती.

आईने मुलाला केला होता फोन

मदुरै येथील एलआयसी कार्यालयात ही घटना घडली. सुरुवातीला ही आग अपघाती वाटली होती, परंतु जेव्हा मृत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली, तेव्हा संशय बळावला. घटनेच्या काही मिनिटं आधी आईने फोन करून घाबरलेल्या आवाजात पोलिसांना कळवण्यास सांगितलं होतं, असं मुलाने तक्रारीत नमूद केलं होतं.

आरोपीच्या जबाबात तफावत 

आरोपी राम हा देखील या आगीत किरकोळ भाजला होता, ज्याला त्याने 'अपघात' असं नाव दिलं होतं. मात्र, चौकशीदरम्यान त्याने वारंवार विसंगत विधानं केल्यामुळे पोलिसांना संशय आला. सखोल तपासानंतर पोलिसांनी अखेर हत्येचा गुन्हा दाखल केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कल्याणी नांबी यांनी अलीकडेच विमा दाव्यांमधील अनियमिततेबाबत तक्रार केली होती आणि राम याच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली होती, जे या हत्येचे मुख्य कारण ठरलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : LIC Manager Burned Alive After Exposing Corruption; Key Call Unveiled Truth.

Web Summary : A LIC manager in Madurai was burned alive by a colleague, Ram, after she exposed insurance claim irregularities. Police investigations revealed Ram poured petrol on Kalyani Nambi, igniting her office. Suspicion arose after Nambi's son reported a frantic call from his mother before her death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआगPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूLIC - Life Insurance Corporationएलआयसी