गडहिंग्लजमध्ये महिलेचा खून? तोंडात कापडाचा बोळा कोंबून फेकले विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:26 IST2025-02-23T14:26:04+5:302025-02-23T14:26:33+5:30
अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्याच्या उद्देशाने महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गडहिंग्लजमध्ये महिलेचा खून? तोंडात कापडाचा बोळा कोंबून फेकले विहिरीत
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील सोलापूरे वसाहतीजवळच्या विहिरीत तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याच्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्याच्या उद्देशाने महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शोभा सदाशिव धनवडे (वय ६२,रा.कचरा डेपोजवळ गडहिंग्लज) असे या महिलेचे नाव आहे.
शनिवारी संध्याकाळी त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्यांना विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विहिरीच्या काठावरील झाडाला मृतदेह अडकला.
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे. मात्र, या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.