धक्कादायक! ताप चेक करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती, १० दिवस बंदी बनवून केला रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:51 IST2021-07-06T15:50:10+5:302021-07-06T15:51:45+5:30

पोलिसांनुसार, देहरादूनमध्ये बेशुद्ध ठेवण्यासाठी हाय डोज ड्रग्स देण्यात आले. जेणेकरून तिच्यावर पुन्हा पुन्हा रेप करता यावा.

Woman loses eyesight after being drugged molested for 10 day in dehradun from Rajasthans | धक्कादायक! ताप चेक करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती, १० दिवस बंदी बनवून केला रेप

धक्कादायक! ताप चेक करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती, १० दिवस बंदी बनवून केला रेप

राजस्थानमधील एक महिला ताप चेक करण्यासाठी एका मेडिकल स्टोरवर गेली होती. त्यानंतर तिला नशेचं इंजेक्शन लावून बेशुद्ध केलं गेलं आणि त्याच स्थिती देहरादूनला नेऊन तिच्यावर १० दिवस रेप करण्यात आला. यादरम्यान तिला सतत नशेचं इंजेक्शन देण्यात आलं होतं.

पोलिसांनुसार, देहरादूनमध्ये बेशुद्ध ठेवण्यासाठी हाय डोज ड्रग्स देण्यात आले. जेणेकरून तिच्यावर पुन्हा पुन्हा रेप करता यावा. पोलीस अधिकारी म्हणाले की, हाय डोजमुळे महिलेच्या डोळ्यांची दृष्टी गेली. पोलीस अधिकारी म्हणाले की, आरोपीला देहरादूनहून अटक करून राजस्थानला आणण्यात आलं आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्याने मुलाने त्रिशूलने केली वडिलांची हत्या)

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेच एफआयआर दाखल केला. पीडितेच्या आईनुसार, त्यांची मुलगी गेल्या महिन्यात १८ जूनला बाजारातून भाज्या आणि फळं घेऊन ताप चेक करण्यासाठी आरोपीच्या मेडिकल शॉपमध्ये गेली होती. आरोपीने तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं. ज्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि तिला ब्रेजा कारमधून देहरादूनला नेण्यात आलं. इथे तिला १० दिवस बंदी बनवून ठेवण्यात आलं.

पोलिसांनी एक टीम तयार करून देहरादून पाठवली आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. सोमवारी त्याला पाली पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: Woman loses eyesight after being drugged molested for 10 day in dehradun from Rajasthans