वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:20 IST2023-02-02T14:18:14+5:302023-02-02T14:20:19+5:30

याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणाही आहेत.

Woman kills her son to marry lover in Bharuch Gujarat | वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का

वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का

गुजरातच्या भरूचमध्ये आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्याचा मुलाची हत्या केली. येथील सोनम सोसायटीमध्ये राहणारा  13 वर्षांचा क-कृष्णा 23 जानेवारीला घरातून बेपत्ता झाला होता. 

याबाबत त्याची आई ममता देवी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती आणि संशय व्यक्त करत तिने सांगितलं की, तिच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. यादरम्यान 31 जानेवारीला अंकलेश्वरमध्ये 13 वर्षाच्या एका मुलगा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह त्याच मुलाचा होता जो काही दिवसांआधी बेपत्ता झाला होता. 

याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणाही आहेत.

रिपोर्ट समोर आल्यावर पोलिसांचा मुलाच्या आईवर संशय वाढला. मृतकाची आई ममता देवीची चौकशी करत असताना समजलं की, तिचं तिच्या दिरासोबत 8 वर्षापासून अनैतिक संबंध आहेत. तसेच असंही समोर आलं की,  प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने त्याच्यासोबत मिळून मुलाच्या हत्येचा प्लान केला होता.

पोलिसांनी ममता देवीचा प्रियकर भागवत सिंह यालाही अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने स्वीकारलं की, त्याने पुतण्याची हत्या केली. आरोपीने पुढे सांगितलं की, ममता देवीसोबत त्याचं अफेअर सुरू होतं आणि दोघांना लग्नाचा निर्णय घेतला होता. पण पती आणि मुलगा अडथळा ठरत होते. दोघांनी आधी मुलाला आणि नंतर पतीला मारण्याचा प्लान केला होता.

Web Title: Woman kills her son to marry lover in Bharuch Gujarat