धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 15:36 IST2018-11-22T15:33:15+5:302018-11-22T15:36:03+5:30

एका दातावरुन पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

woman kills boyfriend cooks his body parts and serves it to workers and dogs | धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले

धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले

अबूधाबी: संयुक्त अरब अमिरातीत मोरोक्को वंशाच्या एका ३० वर्षीय महिलेनं केलेल्या गुन्ह्यानं पोलिसांनादेखील धक्का बसला आहे. प्रियकराची हत्या करुन त्याचे तुकडे तुकडे केल्याची कबुली महिलेनं पोलिसांना दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं प्रियकराचं तुकडे शिजवून ते काही कामगारांना जेवण म्हणून दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या एका दाताच्या मदतीनं या संपूर्ण गुन्ह्याच्या छडा लावला. 

अबूधाबीतल्या एका वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रियकराच्या हत्येप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराला एका दुसऱ्या तरुणीशी विवाह करायचा होता. ही गोष्ट त्यानं आरोपी महिलेला सांगितली. यामुळे महिला प्रचंड संतापली आणि तिनं २० वर्षीय प्रियकराची हत्या केली. प्रियकरानं आपल्याला सोडून जावं, असं वाटत नसल्यानं हत्या केल्याची कबुली तिनं पोलिसांना दिली.

प्रियकराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिनं त्याचे तुकडे केले. यानंतर तिनं त्याचा जेवणात वापर केला आणि ते काही कामगारांना खाऊ घातलं. याशिवाय उरलेलं अन्न कुत्र्यांना दिलं. काही दिवस कोणालाच या घटनेचा सुगावा लागला नाही. मात्र काही दिवसानंतर हत्या झालेल्या प्रियकराचा भाऊ शोधत त्याच्या घरी आला. मात्र तिथे भाऊ न सापडल्यानं तो आरोपी महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याठिकाणी त्याला एक दात सापडला. त्याबद्दल त्यानं महिलेकडे विचारणा केली. मात्र तिनं कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. 

यानंतर प्रियकराच्या भावानं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेच्या घरी सापडलेल्या दाताची डीएनए चाचणी केली. त्यातून तो मृत तरुणाचा असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. त्यावेळी तिनं गुन्ह्याची कबुली दिली. आपण प्रियकराची हत्या करण्यासाठी एका मित्राची मदत घेतल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. सध्या या महिलेच्या मानसिक स्थितीची तपासणी सुरू आहे. 

Web Title: woman kills boyfriend cooks his body parts and serves it to workers and dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.