प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:50 IST2025-08-06T10:49:34+5:302025-08-06T10:50:15+5:30

या महिलेने तिच्या प्रियकराचे सत्य पोलिसांपासून लपवून त्यांची दिशाभूल केली. उपचारानंतर आता ही महिला तिच्या गावी परतली आहे

Woman injured private parts while having sex with boyfriend; Woman lies to Mumbai Police, truth comes out | प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले

प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ३० वर्षीय महिला प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात ही तक्रार खोटी निघाली. ट्रेनमध्ये ही महिला प्रियकरासोबत संबंध बनवत होती, त्यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाली. बॉयफ्रेंडसोबतचं सत्य लपवण्यासाठी तिने बलात्काराचा खोटा आरोप केला होता. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता पडताळली आणि आता हे प्रकरण बंद केले जात आहे.

काय आहे प्रकरण?

१३ जुलैला एका सरकारी रुग्णालयाने दादर रेल्वे पोलिसांना एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाल्याची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा महिलेची विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले की, प्रयागराजवरून गोरखपूर एक्सप्रेसने मुंबईला येत होती. जनरल कोचमधून मी प्रवास करत होते. त्यावेळी शौचालयाला गेले असताना अज्ञात व्यक्ती तिथे घुसला आणि त्याने दरवाजा बंद केला. त्याने माझ्यावर जबरदस्ती करत लैंगिक छळ केला असा आरोप महिलेने केला. महिलेच्या आरोपावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. परंतु जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यामागचे सत्य उघड झाले. 

या महिलेने खोटी तक्रार केल्याचं तपासात समोर आले. आता रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण बंद केले आहे. मी कुठलीही तक्रार करणार नाही, त्यातून माझी बदनामी होईल असं या महिलेने पोलिसांना सांगितले होते. परंतु पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला. महिलेकडून तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत तपासाला सुरुवात केली. 

तपासात काय आढळलं?

गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. महिलेने सांगितलेल्या जागेवरही तपासणी केली. त्यावेळी जे सत्य उघड झाले त्याने पोलिसांना धक्का बसला. ही महिला तिच्या प्रियकरासोबत मुंबईत आली होती. १२ जुलैला ते एका गेस्ट हाऊसला थांबले होते. तिथे दोघांनी शारीरिक संबंध बनवले. त्यावेळी महिलेच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाली, ती उपचारासाठी रुग्णालयात गेली. त्यावेळी रुग्णालयाने हा प्रकार पोलिसांना कळवला. या महिलेने तिच्या प्रियकराचे सत्य पोलिसांपासून लपवून त्यांची दिशाभूल केली. उपचारानंतर आता ही महिला तिच्या गावी परतली आहे. 

प्रियकराला वाचवण्यासाठी खोटा आरोप

महिलेने तिच्या प्रियकराला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला होता. आता प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात येत आहे. महिलेकडून दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात तपासात समोर आलेली घटना यात अंतर आहे. मात्र महिलेच्या आरोपाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास केला. त्यातून ही कहाणी असल्याचं पुढे आले. 

Web Title: Woman injured private parts while having sex with boyfriend; Woman lies to Mumbai Police, truth comes out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.