स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:08 IST2019-06-11T16:06:08+5:302019-06-11T16:08:41+5:30
उपचारादरम्यान १८ मेला वर्षा यांचा मृत्यू झाला होता.

स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू
नालासोपारा - पश्चिमेकडील इमारतीमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा जेवण बनवताना लागलेल्या आगीमध्ये भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावातील नाना शंकर शेठ चौकातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावरील सदनिका नंबर ३ मध्ये राहणाऱ्या वर्षा राजेंद्र कांबळे (५५) यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे. १४ मेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वर्षा या किचनरुममध्ये स्वयंपाक बनवत असताना त्यांच्या अंगावरील मॅक्सिने पेट घेतल्याने चेहऱ्याला, पोटाला, पाठीला व दोन्ही हाताला व पायाला भाजल्याने गंभीर जखमी झाला होत्या. उपचारासाठी प्रथम नालासोपारा मधील रिद्धीविनायक रुग्णालयात भर्ती केले व पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात १५ मे ला भर्ती केले. पण याठिकाणी उपचारादरम्यान १८ मेला वर्षा यांचा मृत्यू झाला होता.