Crime News: विवाहानंतरही पिच्छा न सोडणाऱ्या प्रियकराला महिलेने दिली क्रूर शिक्षा, आधी घरी बोलावले, मग केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 18:14 IST2022-03-06T18:13:55+5:302022-03-06T18:14:33+5:30
Crime News: प्रेमसंबंधातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रेटर नोएडामध्ये एका तरुणाच्या माजी प्रेयसीने त्याला घरी बोलावले. त्यानंतर त्याचे वडील आणि आईने मिळून त्याची हत्या केली.

Crime News: विवाहानंतरही पिच्छा न सोडणाऱ्या प्रियकराला महिलेने दिली क्रूर शिक्षा, आधी घरी बोलावले, मग केली हत्या
लखनौ - प्रेमसंबंधातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रेटर नोएडामध्ये एका तरुणाच्या माजी प्रेयसीने त्याला घरी बोलावले. त्यानंतर त्याचे वडील आणि आईने मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कालव्यात फेकला. पोलिसांनी सांगितले की, सदर तरुण या प्रेयसीला तिच्या विवाहानंतरही कॉल आणि मेसेज करून त्रास देत असे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
या प्रकरणी सूरजपूर ठाण्याचे एसएचओ अवधेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, सूरजपूरमधील राहणारा रॉबिन २७ फेब्रुवारी रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्याचे मोनिका नावाच्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी तपास पुढे नेला असता मोनिकाचा २०१९ मध्ये विवाह झाल्याचे समोर आले. मात्र तरीही आरोपी तिला सतत भेटण्याचा प्रयत्न करत असे. तसेच तिला फोन कॉल आणि मेसेज करत असे. रॉबिनच्या या कृतीमुळे मोनिका त्रस्त होती. तिने ही गोष्ट भाऊ आणि आईच्या कानावर घातली. त्यानंतर या सर्वांनी मिळून रॉबिनच्या हत्येचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भेटण्यासाठी आतूर झालेल्या रॉबिनकडून मोनिकावर सातत्याने दबाव बनवण्यात येत होता. त्यानंतर मोनिकाने पतीसोबर मिळून एक योजना आखली. त्यानुसार मोनिकाने रॉबिनला २७-२८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या घरी बोलावले. त्यानंतर आरोपी सुबोध, सागर, रवी यांनी रॉबिनच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर एलईडी केबलने रॉबिनचा गळा आवळून त्याची हत्या केली. या गुन्ह्यात मोनिकाची आई आणि तिचे तीन भाऊही सहभागी होते.