पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:33 IST2019-05-07T16:33:21+5:302019-05-07T16:33:50+5:30

थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

woman gang raped in alwar rajasthan fir filed on april 30 but no arrests made yet | पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल

पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल

अल्वर- राजस्थानमधल्या अल्वरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आहे. थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. तर त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. निवडणुकीदरम्यान ही सामूहिक बलात्काराची घटना उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना अटक करून कठोरातली कठोर कारवाई करावी, यासाठी जागोजागी विरोध प्रदर्शनही केलं जातंय. परंतु अद्यापही मुख्यमंत्री अशोक गेहलोत किंवा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणात 30 एप्रिलला गुन्हा दाखल करून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्स नुसार, हे प्रकरण 26 एप्रिलचं आहे. जेव्हा महिला पतीबरोबर सासरी जात होती. रस्त्यातच त्या नराधमांनी या दोघांना गाठून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पतीचे हात बांधून त्यांच्या समोरच या नराधमांनी आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार केला. 

व्हिडीओ बनवून केला व्हायरल
आरोपींनी त्या महिलेवरच्या बलात्काराचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी हसताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केला, पण त्यानंतर स्थानिकांचा विरोध पाहता गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
 

Web Title: woman gang raped in alwar rajasthan fir filed on april 30 but no arrests made yet