स्वत:च्याच घरात फोनवर बोलत होती महिला; पोलिसांनी 27 हजारांचा दंड केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:45 PM2021-05-30T17:45:02+5:302021-05-30T17:45:16+5:30

American police fined for loudly talking on Phone: रॉबिन्सन म्हणते की, तिला फोनवर बोलत असल्यासाठी दंड झाला आहे. या पावतीवर आजुबाजुच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने उपद्रव केल्याचे लिहिण्यात आले आहे. मी या पावतीच्या विरोधात जाणार आहे.

woman fined $385 for talking loudly on the phone in America | स्वत:च्याच घरात फोनवर बोलत होती महिला; पोलिसांनी 27 हजारांचा दंड केला

स्वत:च्याच घरात फोनवर बोलत होती महिला; पोलिसांनी 27 हजारांचा दंड केला

Next

आपल्या स्वत:च्या घरात फोनवर बोलत असताना तुमच्यावर पोलीस दंड ठोठावू शकतात का? अमेरिकेत असे झाले आहे. एका महिला तिच्या घरात जोरजोराने फोनवर बोलत होती. पोलिसांनी तिला $385 जवळपास 27 हजार रुपयांचा दंड ठोठावला. (A black Michigan woman was fined $385 for talking too loudly on her phone)


न्यूयॉर्क पोस्टनुसार या महिलेचे नाव Diamond Robinson आहे. ती तिच्या Cushing Street, Eastpointe मध्ये फोनवर बोलत असताना तिच्या घरी कधी खाली जात होती, कधी वर येत होती. तेव्हा तिच्या शेजाऱ्याने तू तुझा फोन बंद करू शकतेस का आणि हळू बोलू शकतेस का, अशी विचारणा केली. तरीही रॉबिन्सनने तिचे बोलणे सुरुच ठेवले. त्या शेजारी महिलेला तिने सांगितले की, माझ्य़ा समोरून तुझा चेहरा हटव, निघून जा असे सांगितले. 


यानंतर तीनच मिनिटांत तिथे Eastpointe पोलीस पोहोचले. रॉबिनसन यांनी ऑफिसरना सांगितले की, हे सारे मी फेसबुक लाईव्ह करणार आहे, कारण लोकांना खरे काय आहे ते समजावे. हे ती रेकॉर्डही करत होती. एवढ्यात पोलिसांनी तिच्यावर दंडाची पावती फाडली. 


तिने यानंतर फेसबुक लाईव्ह केले. यामध्ये रॉबिन्सन म्हणते की, तिला फोनवर बोलत असल्यासाठी दंड झाला आहे. या पावतीवर आजुबाजुच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने उपद्रव केल्याचे लिहिण्यात आले आहे. मी या पावतीच्या विरोधात जाणार आहे. तसेच माझ्या घराचे सीसीटीव्ही फुटेजही शेअर करणार आहे. मी माझ्या मालमत्तेमध्ये बोलत होते, यात दुसऱ्याला काय आक्षेप असावा, असा सवालही तीने केला आहे. 


मी कृष्णवर्णीय असल्याने मला लक्ष्य केले गेले आहे. ज्या महिलेने पोलिसांना फोन केला होता ती काही आठवड्यांपूर्वीच शिफ्ट झाली आहे. रॉबिन्सने त्या महिलेलाही उद्देशून म्हटले की, मी तुझे काय वाईट केले होते, तू माझ्यामुळे त्रस्त आहेत का? काय चाललेय इथे. 
 

Web Title: woman fined $385 for talking loudly on the phone in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.