स्वतःला मृत घोषित करून प्रियकरासोबत पळाली; महिलेचा 'दृश्यम' स्टाईल प्लॅन पोलिसांनी असा उधळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:46 IST2026-02-17T15:44:48+5:302026-02-17T15:46:41+5:30

स्वतःच्या घराशेजारी एक अनोळखी मृतदेह टाकून ती गायब झाली, जेणेकरून जगाला वाटावे की तिच्यासोबत काही अघटित घडले आहे.

Woman declared herself dead and ran away with boyfriend; Police foiled woman's 'visible' style plan! | स्वतःला मृत घोषित करून प्रियकरासोबत पळाली; महिलेचा 'दृश्यम' स्टाईल प्लॅन पोलिसांनी असा उधळला!

स्वतःला मृत घोषित करून प्रियकरासोबत पळाली; महिलेचा 'दृश्यम' स्टाईल प्लॅन पोलिसांनी असा उधळला!

पतीसोबत राहण्याची इच्छा नव्हती आणि प्रियकरासोबत नवे आयुष्य सुरू करायचे होते. यासाठी एका महिलेने चक्क स्वतःच्याच हत्येचा असा काही बनाव रचला की, काही काळ पोलीसही चक्रावून गेले. स्वतःच्या घराशेजारी एक अनोळखी मृतदेह टाकून ती गायब झाली, जेणेकरून जगाला वाटावे की तिचा खून झाला आहे. मात्र, कर्नाटक पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे या फिल्मी बायकोचा आणि तिच्या प्रियकराचा भांडाफोड झाला आहे.

काय होता हा खळबळजनक प्लॅन?

संबंधित महिलेला आपल्या पतीपासून कायमची सुटका हवी होती. तिने विचार केला की, जर मी मेली आहे असे सर्वांना पटवून दिले, तर पोलीस माझा शोध घेणार नाहीत आणि मी प्रियकरासोबत सुखाने जगू शकेन. यासाठी तिने कुठूनतरी एक अनोळखी स्त्रीचा मृतदेह मिळवला आणि तो आपल्या घराशेजारी आणून टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये आणि तो आपलाच वाटावा, यासाठी तिने काही पुरावेही तिथे पेरले होते.

पोलिसांना आला संशय

सुरुवातीला ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी तो मृतदेह त्या महिलेचाच असल्याचे मानले आणि परिसरात हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये पोलिसांना काही विसंगती आढळली. मृतदेहाचे कपडे आणि इतर वस्तू जरी महिलेच्या असल्या तरी, शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीचे शारीरिक ठसे आणि बेपत्ता महिलेचे वर्णन जुळत नसल्याचे समोर आले. इथूनच तपासाची चक्रे फिरली.

तांत्रिक तपासात अडकली स्मार्ट पत्नी

स्वतःला मृत घोषित करून ही महिला प्रियकरासोबत पसार झाली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेत तिचा मोबाईल सिग्नल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी ती एका व्यक्तीसोबत जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी माग काढत थेट छापा टाकला आणि या महिलेला तिच्या प्रियकरासह ताब्यात घेतले.

तो मृतदेह कुणाचा? तपास सुरू

पोलिसी चौकशीत महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. "पतीपासून सुटका मिळवण्यासाठी मी हा मर्डर ड्रामा रचला," अशी कबुली तिने दिली. मात्र, आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, तो अज्ञात मृतदेह नेमका कुणाचा होता? महिलेने तो मृतदेह कुठून आणला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Web Title : महिला ने की अपनी मौत की झूठी साजिश, प्रेमी संग भागी; पुलिस ने किया पर्दाफाश।

Web Summary : पति से छुटकारा पाने के लिए एक महिला ने अज्ञात शव के साथ अपनी ही हत्या का मंचन किया। पुलिस जांच में सच्चाई सामने आई, और प्रेमी के साथ रहने की उसकी योजना का पर्दाफाश हो गया। अज्ञात शव का स्रोत अभी भी जांच के अधीन है।

Web Title : Woman fakes death, elopes with lover; police foil 'Drishyam' plot.

Web Summary : A woman, wanting to escape her husband, staged her own murder with an unknown body. Police investigation revealed the truth, exposing her plan to live with her lover. The source of the unidentified body remains under investigation.