बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:03 IST2025-06-14T20:02:02+5:302025-06-14T20:03:30+5:30

विशेष म्हणजे या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे परंतु कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही.

Woman cuts off Private part of rapist in Muzaffarpur | बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मुझफ्फरपूर - जिल्ह्यात एका महिलेशी बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न नराधमाला चांगलाच महागात पडला. ज्या महिलेवर तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता, तिने तीव्र विरोध करत विळ्याने त्याचे गुप्तांग कापले. घटनास्थळी युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला स्थानिकांनी हॉस्पिटलला दाखल केले. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. 

माहितीनुसार, युवकाने गावातीलच एका महिलेला कर्ज दिले होते. कर्जाचे पैसे मागण्याच्या बहाण्याने तो रात्री उशिरा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर पैशाचा तगादा लावत त्याने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. युवकाकडून बळजबरीने तिच्या अंगावर हात टाकण्यात आला. तिने वारंवार युवकाला विरोध केला तरीही युवक ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यानंतर युवकाकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नाने महिलेला तिची प्रतिमा मलिन होईल ही भीती वाटली त्यामुळे तिने युवकावर हल्ला केला. शेजारीस असलेल्या विळ्याने युवकाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. त्यात तो रक्तबंबाळ झाला.

महिलेने युवकाचे गुप्तांग कापल्यानंतर युवक जोरजोरात किंचाळू लागला. त्यानंतर आसपासचे गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तिथून तातडीने जखमी अवस्थेत युवकाला ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार करून त्याला सीएचसी हॉस्पिटलला पाठवण्यात आले. या युवकाची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं. युवक विवाहित असून त्याची पत्नी त्याला सोडून विभक्त राहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो व्याजावर पैसे देण्याचे काम करत होता. या महिलेनेही त्याच्याकडून कर्ज घेतले होते. तेच पैसे मागण्याच्या बहाण्याने त्याने महिलेवर हात टाकला. 

विशेष म्हणजे या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे परंतु कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. तक्रार प्राप्त होताच पुढील कारवाई करू अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी मोनू कुमार यांनी दिली आहे. तर महिलेने उचललेले पाऊल योग्यच आहे असं गावकऱ्यांनी म्हटलं. त्याशिवाय या युवकाने गावातील दुसऱ्या महिलांवरही बऱ्याचदा चुकीची वर्तवणूक केली आहे. त्याला मिळालेली शिक्षा चांगलीच आहे. पोलिसांना या महिलेचे कौतुक करायला हवे. तिने समाजातील या नराधमाला अद्दल घडवली असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Woman cuts off Private part of rapist in Muzaffarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.