शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

5 वर्षांपासून DSP सोबत संबंध, 50 अश्लील व्हिडीओ; महिला कॉन्स्टेबलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:49 AM

woman constable arrested for doing obscene act : या महिला कॉन्स्टेबलला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जयपूर : आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर राज्यस्थान पोलिस सेवेतील एका अधिकाऱ्यासोबत अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या आरोपाखाली एका निलंबित महिला कॉन्स्टेबलला रविवारी पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) अटक केली. या महिला कॉन्स्टेबलला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (woman constable arrested for doing obscene act in front of son in swimming pool)

याआधी, या अश्लील व्हिडिओ प्रकरणात निलंबित डीएसपी हिरालाल सैनी याला सुद्धा अटक करण्यात आली होती, त्याला काल 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एसओजीचे म्हणणे आहे की, महिला कॉन्स्टेबल तिच्या काकांच्या निवासस्थानी कलवार भागात होती. तिला पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, व्हिडीओ क्लिप 10 जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलवरून अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये काढण्यात आली होती. हिरालाल सैनी अजमेर जिल्ह्यात ब्यावर सर्कल अधिकारी म्हणून तर महिला कॉन्स्टेबल जयपूरमध्ये तैनात होती. 10 जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलच्या आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हिरालाल सैनी आणि महिला कॉन्स्टेबल मुलासह रिसॉर्टमध्ये गेले होते. यावेळी मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांनी स्विमिंग पूलमध्ये अश्लील व्हिडिओही शूट केले. 

डीएसपी 17 दिवसांची पोलीस कोठडीन्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे. एसोजी म्हणणे होते की, ज्या प्रकारचे व्हिडीओ बाहेर आले आहेत, त्यावरून बरीच गुपिते अजून उघड होणे बाकी आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, निलंबित डीएसपीचे हावभाव पाहून असे वाटते की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही. एसओजीच्या चौकशी दरम्यान, निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे आढळून आले आहे. या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते.

ब्लॅकमेल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल बनवत होती व्हिडीओ - सैनीआरोपी सैनीने एसओजीला सांगितले आहे की, महिला कॉन्स्टेबलकडे असे 50 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो आहेत आणि ती भविष्यात त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत होती. 10 जुलै रोजी बनवलेला हा व्हिडिओ ती तिच्या मोबाईल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती, पण तो चुकून व्हॉट्सअॅप स्टेटसवर सेव्ह झाला. जो महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या मंडळींनी पाहिला आणि तिथून तो व्हायरल झाला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी