नात्याला काळीमा! भाचा-भाचीची हत्या करून मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक महिने फिरत राहिली महिला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 12:41 PM2021-08-01T12:41:30+5:302021-08-01T12:49:48+5:30

Crime News : भाचा-भाची गायब होण्यामागे महिलेचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता.

woman carrying dead bodies of two children in her car for months arrested in us baltimore county | नात्याला काळीमा! भाचा-भाचीची हत्या करून मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक महिने फिरत राहिली महिला अन्...

नात्याला काळीमा! भाचा-भाचीची हत्या करून मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक महिने फिरत राहिली महिला अन्...

Next

जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अमेरिकेत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला आपला 7 वर्षांचा भाचा आणि 5 वर्षांची भाची या दोघांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने दोघांचे मृतदेह आपल्या गाडीत ठेवले होते. काही दिवस नाही तर अनेक महिने या दोघांचा मृतदेह गाडीमध्ये होता. हा भयंकर प्रकार मॅरीलँड येथील बालतिमोर काउंटी येथील आहे. 

पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकोल जॉनसन 33 वर्षांची आहे. भाचा-भाची गायब होण्यामागे तिचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी साधारण रात्री 11 वाजता महिलेची कार एसेक्स भागातील रस्त्यावर थांबवली. आणि गाडीचा तपास सुरू केला. त्यानंतर जे काही दिसलं ते पाहून पोलिसांना धक्काच बसला. या महिलेच्या गाडीत जॉशलिन जॉन्सन (7) आणि लॅरी ओ'नील (5) या दोघांचे मृतदेह सापडले. दोघांचे मृतदेह तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. 

पोस्टमार्टम झाल्यानंतर दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल, असं सांगितलं जात आहे. निकोल जॉन्सनवर बाल शोषण आणि लहान मुलांचा जीव घेणे यासह अनेक प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे. महिलेने आपली भाची आणि भाच्याची हत्या का केली, यामागील कारण समोर आलेलं नाही. मात्र ही घटना पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेत घडलेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना आधीपासून महिलेवर संशय होता. तपासात हे उघड झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: woman carrying dead bodies of two children in her car for months arrested in us baltimore county

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app