घरून पळून जाण्यासाठी तिने बॉयफ्रेन्डला बोलवलं, पण दगा देत पतीसोबत मिळून केली त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:44 IST2022-04-06T15:44:15+5:302022-04-06T15:44:36+5:30

chhattisgarh Crime News : पोलिसांना माहिती मिळाली की, सोनू यादव बनडीपा मोहल्ल्यात जात होता. गेल्यावर्षीच त्याचं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं होतं.

Woman brutally murdered boyfriend along with husband in Chhattisgarh | घरून पळून जाण्यासाठी तिने बॉयफ्रेन्डला बोलवलं, पण दगा देत पतीसोबत मिळून केली त्याची हत्या

घरून पळून जाण्यासाठी तिने बॉयफ्रेन्डला बोलवलं, पण दगा देत पतीसोबत मिळून केली त्याची हत्या

chhattisgarh Crime News : छत्तीसगढच्या जशपूरमध्ये एका तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. गेल्या ४ एप्रिलला जशपूर जिल्ह्यातील बासनताला सुखबासुपारा बेलटोली गावातील एका पुलाजवळ ३६ वर्षीय सोनू यादवचा मृतदेह सापडला होता. अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलिसांना माहिती मिळाली की, सोनू यादव बनडीपा मोहल्ल्यात जात होता. गेल्यावर्षीच त्याचं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं होतं.

पोलिसांनुसार, त्यावेळी दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत महिलेच्या पतीला ललित राम चौहान याला समजलं होतं. त्यानंतर त्याने पत्नी आणि सोनूचं बोलणं बंद केलं होतं. यावरून सोनू आणि महिलेच्या पतीचं भांडणही झालं होतं. दीड महिन्यापूर्वीही ललित राम चौहानने मृत सोनूला मारहाण केली होती. पोलिसांनुसार, गेल्या २४ मार्चला बॉयफ्रेन्ड सोनूने सावित्रीबाई चौहानला एक मोबाइल आणि सिम कार्ड घेऊन दिला होता. ही बाब सावित्रीबाईने पतीला सांगितली.

पोलिसांनुसार, गेल्या ३ एप्रिलला सोनू यादव आपली प्रेयसी सावित्रीबाईोबत बोलत होता आणि तिला पळून जाऊन असं बोलला होता. त्यासाठी तो तिच्या घरी येणार होता. हेही सावित्रीबाईने पतीला सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे महिला आणि तिच्या पतीने सोनू यादवला जीवे मारण्याचा प्लान केला होता. त्याच दिवशी सोनू आणि महिलेचं फोनवर बोलणं झालं. महिला सोनूसोबत पळून जाण्यास तयार झाली. तिने त्याला घरी येण्यास सांगितलं. 

रात्री जवळपास ९ वाजता सोनू यादव आपल्या बाइकने गावातील पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी ललित राम चौहान याने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला. तो खाली पडला. त्यानंतर सावित्री बाई चौहानने प्लास्टिकच्या दोरीने प्रियकर सोनूचा गळा आवळला. त्यानंतर त्याला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
 

Web Title: Woman brutally murdered boyfriend along with husband in Chhattisgarh