पुलाखाली पोत्यात महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:15 IST2025-09-17T18:10:39+5:302025-09-17T18:15:12+5:30
तेलंगणात एका गोणीमध्ये नग्नावस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पुलाखाली पोत्यात महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय
Telangana Crime:तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. हैदराबादमधील किस्मतपूर पुलाखाली एका तरुणीचा नग्न मृतदेह पोत्यात सापडला. किस्मतपूर पुलाखाली एका तरुणीचा नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिला मारण्यात आल्याचाही संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. मृतदेहावर कपडे नसल्याने खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. हैदराबादमधील घटनेची माहिती मिळताच राजेंद्रनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
पोलीस संशयितांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे तपासत आहेत. प्राथमिक तपासात अद्याप मृताची ओळख पटलेली नाही पोलीस स्थानिक रहिवाशांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे. एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले असून जे सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी जर कोणाला या घटनेबाबत काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, पोलीस बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांची चौकशी करत आहोत. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली आहेत का याचाही तपास केला जात आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी सुगावा आणि बोटांचे ठसे गोळा करण्यात आले आहेत.