वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 21:13 IST2019-08-27T21:10:08+5:302019-08-27T21:13:18+5:30
महिलेला पोलिसांनी अटक केली असून पसार झालेल्या पुरुषाचा पोलीस शोध घेत आहेत.

वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक
मुंब्रा - पैशाचे अमिष दाखवून महिलांना वेशाव्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला पोलिसांनीअटक केली असून पसार झालेल्या पुरुषाचा पोलीस शोध घेत आहेत. गरीब महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन काहीजणांनी त्यांना वेश्य व्यवसायासाठी प्रवृत्त केले असल्याची माहिती अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्याआधारे शिळ-डायघर परिसरातील हॉटेल शिवा लॉजिंग आणि बोर्डिंगमधील रुम नंबर १०९ मध्ये कक्ष आणि शिळ-डायघर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत करुणा बिस्वास(29,चितामण नगर,शिळ-डायघर) आणि अनिल उर्फ किशोर हे दोघे पैशाचे अमिष दाखवून महिलांना ग्राहकांसोबत शय्यासोबत करण्यासाठी पाठवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. करुणा हिला पोलिसांनी अटक केली असून,न्यायालयाने चौकशीसाठी तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पसार झालेल्या अनिलचा शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांनी लोकमतला दिली.