भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:13 IST2024-11-24T16:12:10+5:302024-11-24T16:13:17+5:30

देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

woman allegedly killed five year daughter after boyfriend refused to accept girl delhi | भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना घडली. बॉयफ्रेंड मुलीला स्वीकारण्यास तयार नसल्याने तिने हे भयंकर पाऊल उचललं. माहिती मिळताच पोलीस पथकाने आरोपी महिलेला अटक केली. आपल्या मुलीचा जीव घेतल्याची कबुली या महिलेने पोलिसांना दिली.

हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील अशोक विहार येथे राहणाऱ्या एका महिलेशी संबंधित आहे. मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पहिला पती तिला सोडून गेला होता. यानंतर ती राहुल नावाच्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर भेटली. राहुलसोबत लग्न करण्याच्या आशेने ही महिला हिमाचल प्रदेशातून दिल्लीत आली होती. मात्र, राहुल आणि त्याचे कुटुंब महिलेच्या मुलीला स्वीकारण्यास तयार नव्हते.

या मुलीवर हिमाचल प्रदेशातील एका नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यावेळी संपूर्ण कुटुंब हिमाचल प्रदेशात राहत होतं. मात्र, नंतर पतीने महिलेला सोडल्यानंतर ती राहुल नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि दिल्लीत आली. या महिलेने मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास तिने मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर ती मुलीच्या मृतदेहाजवळ बसून सुमारे तीन तास रडत राहिली.

पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी महिलेने सुरुवातीला कोणालाही काहीही सांगितलं नाही. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुलीचा मृतदेह गाडीत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मुलगी गाढ झोपली असल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. ती उठली नाही म्हणून तिला दवाखान्यात घेऊन आलो. मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगताच ती जोरजोरात रडू लागली. मुलीच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा होत्या. तिच्या शरीरावर इतर जखमाही होत्या.

डॉक्टरांनी आरोपी महिलेला मुलीच्या मानेवरील खुणाविषयी विचारले तिला कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. महिलेने आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: woman allegedly killed five year daughter after boyfriend refused to accept girl delhi