गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:34 IST2022-07-19T13:34:15+5:302022-07-19T13:34:38+5:30

Uttar Pradesh : एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महिला गुड्डू नावाच्या व्यक्तीसोबत बरेलीमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती. 10 महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती.

Woman accuses man of hiding religion living with her for months had physical relations many times in ghaziabad uttar pradesh | गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना

गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना

उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये विवाहीत महिलेने प्रियकराविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, प्रियकराने त्याचा धर्म लपवून अनेक महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.  महिलेने सांगितलं की, तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांआधीच पतीने मुलांसह तिला सोडलं होतं. नंतर ती गुड्डू नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दोघांचं अफेअर सुरू झालं.

एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महिला गुड्डू नावाच्या व्यक्तीसोबत बरेलीमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती. 10 महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वीच तो महिला आणि तिच्या मुलाला घेऊन आई-वडिलांच्या घरी गेला होता. तिथे तिला समजलं की, गुड्डू मुस्लिम आहे आणि त्याचं खरं नाव रहमत हसन आहे.

पीडितेने सांगितलं की, 'जेव्हा मी गुड्डूसोबत याबाबत बोलले तेव्हा त्याने मला मारहाण केली. त्याने मला तिथे डांबून ठेवलं. त्याच्या आई-वडिलांनीही माझ्यासोबत मारहाण केली. मला न सांगता माझ्या मुलाचा खतना केला. 10 जुलैला मी कशीतरी तिथून पळून गाझियाबादला पोहोचले'.
महिलेने गाझियाबाद पोलिसांमध्ये गुड्डू विरोधात तक्रार दाखल केली आहे. सीओ सिटी अलोक दुबे म्हणाले की, महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

लिव्ह इन पार्टनरने दिला दगा

याआधी नोएडामधूनही अशी मिळतीजुळती घटना समोर आली होती. इथे महिलेने आपल्या लिव-इन पार्टनरवर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे आणि नंतर गर्भपात करणे तसेच अश्लील फोटो काढून ब्लकमेल केल्याचा आरोप केला होता. रिपोर्टनुसार, मुंबईत राहणारी महिला 2017 मध्ये आईच्या आजारवर उपचार करण्यासाठी नोएडामध्ये आली होती. यादरम्यान महिलेची भेट नोएडाच्या एका मॉलमध्ये एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. महिलेने आरोप लावला की, पार्टनर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती झाल्यावर महिलेने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तो तिला सोडून गेला. 

Web Title: Woman accuses man of hiding religion living with her for months had physical relations many times in ghaziabad uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.