प्रियकरासोबत फरार झाली महिला, भडकलेल्या कुटुंबानं तरुणाच्या घरावर थेट बुलडोझरच चालवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:42 IST2025-03-25T16:40:09+5:302025-03-25T16:42:52+5:30
कथित आरोपी व्यक्तीवर विवाहित महिलेला पळून नेल्याचा संशय आहे. त्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

प्रियकरासोबत फरार झाली महिला, भडकलेल्या कुटुंबानं तरुणाच्या घरावर थेट बुलडोझरच चालवला अन्...
गुजरात मधील भरूच जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. येथे सहा जणांनी एका कथित आरोपीसह त्याच्या नातलगांच्या घरांवरही बुलडोझर चालवल्याची घटना घडली आहे. कथित आरोपी व्यक्तीवर विवाहित महिलेला पळून नेल्याचा संशय आहे. त्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.
यासंदर्भात बोलताना भरूच जिल्ह्यातील वेदाच पोलीस ठाण्याचे निरीक्षक बीएम चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या कुटुंबातील आरोपींनी, महिलेला पळून नेल्याच्या संशयावरून बुलडोझरचा वापर करत राग व्यक्त केला. आरोपींमध्ये महिलेच्य पतीचाही समावेश आहे. त्याला, दुसऱ्या समाजातील व्यक्ती पत्नीसोबत पळून गेल्याचा संशय आहे. ही घटना २१ मार्च रोजी जिल्ह्यातील करेली गावात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 21 मार्चच्या रात्री फुलमाळी समाजाची सहा घरे बुलडोझरने भूईसपाट केली. या संबंधित संशयित व्यक्तीच्या घराचाही समावेश होता. यानंतर, पोलिसांनी बुलडोझर चालकासह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही महिला आणंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात आपल्या पालकांना भेटण्यासाठी गेली होती. तेथूनच संबंधित महिला आणि तरूण पळून गेल्याचा संशय आहे.
संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आणंद पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. तक्रारीनुसार, हेमंत पढियार, सुनील पढियार, बलवंत पढियार, सोहम पढियार आणि चिराग पढियार हे आरोपी व्यक्तीच्या घरी पोहोचले होते आणि त्यांच्या घरातील सदस्यावर महिलेसह पळून गेल्याचा आरोप करत तिला दोन दिवसांत समोर आणण्याचा इशारा दिला होता. यानंतर, 21 मार्चला रात्री साधारणपणे 9 वाजता आरोपींनी कथित तरुणाच्या घरावर बुलडोझर चालवले. एफआयआरनुसार, यात सहा घरांचे नुकसान झाले आहे.