वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू, अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:12 PM2020-05-19T17:12:35+5:302020-05-19T17:14:29+5:30

57 बाटल्यांसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त

Wine shop sealing process underway, crackdown on illegal liquor sellers pda | वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू, अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई 

वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू, अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ते वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.रॉबिनसन डिसोजा(23) आणि अविनाश सिंग (23) हे दोघे त्या वाईन शॉपचे मॅनेजर सुदीपब्रिज नारायण सिंग याच्याशी संगनमत करून ऑनलाईन दारू विक्री न करता बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली.

ठाणे - ऑनलाईन दारू घरपोच विक्री करण्याबाबत ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना घोडबंदर रोडवरील एका वाईन शॉपच्या मॅनेजरसह दोन कामगार मंगळवारी सकाळी ठाणे शहर पोलिसांच्या कासारवडवली पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून 57 बाटल्यांसह रोख रक्कम असा सुमारे 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ते वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाका येथे अनमोल वाईन शॉपचे कामगार रॉबिनसन डिसोजा(23) आणि अविनाश सिंग (23) हे दोघे त्या वाईन शॉपचे मॅनेजर सुदीपब्रिज नारायण सिंग याच्याशी संगनमत करून ऑनलाईन दारू विक्री न करता बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी सापळा रचल्यावर ते मिळून आले. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 57 बाटल्या आणि रोख 2300 रुपये असा 13 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, त्या तिघांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम  65 (ई) सह भादवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्यापही अटक केलेली नाही. मात्र त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. तसेच याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिली असून त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत, ते वाईन शॉप सील करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी एस सुळे करत आहेत.

Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

 

ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

Web Title: Wine shop sealing process underway, crackdown on illegal liquor sellers pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.