Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:32 PM2020-05-19T13:32:08+5:302020-05-19T13:35:13+5:30

Coronavirus : मुंबई शहरामध्ये झोन १ ( कुलाबा ते मरीन ड्राईव्ह), झोन ३ ( ताडदेव, नागपाडा, वरळी ते एन. एम. जोशी मार्ग ), झोन ५ (धारावी ते दादर ) झोन ६ ( चेंबूर ते मानखुर्द ) आणि झोन ९ वांद्रे ते आंबोळी / अंधेरी पश्चिम )मध्ये या तुकड्या दाखल केल्या जाणार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Coronavirus: In 'Hotspot' mumbai Central Security Forces deployed, demanded by Uddhav Thackeray pda | Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

Next
ठळक मुद्दे ३१ मेपर्यंत भारतात वाढवलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा आणि अवघ्या ७ ते ८ दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लष्कर बोलवणार नसून राज्यातील पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्र सुरक्षा दलाच्या तुकड्या बोलवणार असल्याचे संकेत दिले होते. 

मुंबई -  कोरोना व्हायरसने गेली दोन महिने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यात लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेप्रमाणेच आता पोलीस यंत्रणा देखील थकली आहे. दरम्यान ३१ मेपर्यंत भारतात वाढवलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा आणि अवघ्या ७ ते ८ दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये CISF आणि CRPF च्या तुकड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये CISF आणि CRPF च्या ५ तुकड्या दाखल झाल्या आहेत. मुंबई शहरामध्ये झोन १ ( कुलाबा ते मरीन ड्राईव्ह), झोन ३ ( ताडदेव, नागपाडा, वरळी ते एन. एम. जोशी मार्ग ), झोन ५ (धारावी ते दादर ) झोन ६ ( चेंबूर ते मानखुर्द ) आणि झोन ९ वांद्रे ते आंबोळी / अंधेरी पश्चिम )मध्ये या तुकड्या दाखल केल्या जाणार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.


मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद ही शहरं सध्या रेड झोनमध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 1200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी मुंबईत 600 जणांचा समावेश आहे. तर 12 जणांनी जीव देखील गमावला आहे. अशातच सलग 2 महिने अविरत काम केल्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यांना काही काळ आराम देऊन पुन्हा कामावर रूजू करण्यासाठी आता केंद्राचे सुरक्षा दल महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करणार आहेत.पुणे शहरात काही दिवसांपूर्वीच रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. त्यासोबतच नाशिक, अमरावती, औरंगाबाद मध्येही तुकड्या तैनात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात लष्कर बोलवणार असल्याचे वावडे उडले होते. त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लष्कर बोलवणार नसून राज्यातील पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्र सुरक्षा दलाच्या तुकड्या बोलवणार असल्याचे संकेत दिले होते. 

सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार

 

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी  

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

Web Title: Coronavirus: In 'Hotspot' mumbai Central Security Forces deployed, demanded by Uddhav Thackeray pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.