धारदार शस्त्राने भोकसून वाईन शॉपच्या मॅनेजरचा खून, नांदेडमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:13 IST2022-09-02T16:11:59+5:302022-09-02T16:13:26+5:30
तरुणांच्या हल्ल्यात जखमी वाकोरे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

धारदार शस्त्राने भोकसून वाईन शॉपच्या मॅनेजरचा खून, नांदेडमध्ये खळबळ
नांदेड - शहरात वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आल्याने खळबळ उडाली. शहरातील ढवळे कॉर्नर परिसर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. माधव जीवनराव वाकोरे असं खुन झालेल्या व्यवस्थापकाच नावं आहे. दारुच्या पैश्याच्या कारणावरुन काही तरुणांसोबत वाईन शॉपचे व्यवस्थापक माधव वाकोरेचा वाद झाला. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा तरुणांचे टोळके वाईन शॉपवर आले आणि वाकोरे यांना मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले.
तरुणांच्या हल्ल्यात जखमी वाकोरे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात मारेकरांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मारेकऱ्यां च्या तपासात पथके रवाना केली आहेत. वाईन शॉप हा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामध्ये एकूण सहा आरोपी असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, उर्वरित तीन आरोपींचा शोध घेणे चालू आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय अशोक भोरबांड यांनी ही माहिती दिली.