शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईक याचे मलेशियातील नागरिकत्व रद्द होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 19:57 IST

मलेशिया प्रशासनाने भारतीय इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईकने त्याच्या देशाबाबत भडकाऊ वक्तव्य केल्याबाबत समन्स पाठविले आहेत. 

ठळक मुद्देदेशास नुकसानदायक काम केल्याचं सिद्ध झाल्यास टीव्हीवर भाषण देणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याचं नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. अनेकवेळा समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर राहिला नसल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

क्वालालंपूर - मलेशियाचेपंतप्रधान डा. महातिर मोहम्‍मद यांनी दिलेल्या माहितीनुसार देशास नुकसानदायक काम केल्याचं सिद्ध झाल्यास टीव्हीवर भाषण देणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याचं नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मलेशिया प्रशासनाने भारतीय इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईकने त्याच्या देशाबाबत भडकाऊ वक्तव्य केल्याबाबत समन्स पाठविले आहेत. 

भारत देशातून फरार झालेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष आणि इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकचे वास्तव्य मलेशियात असावे, असा भारतीय तपास यंत्रणेला संशय आहे. अनेकवेळा समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर राहिला नसल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. दोन समाजांमध्ये अशांतता निर्माण करणे, बेकायदेशीर कृत्य करणे, असे गुन्हे नाईकवर नोंदविले आहेत. त्याशिवाय ढाकामध्ये जुलै, २०१६ मध्ये एका बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणात त्याचा हात असल्याचा संसय तपास यंत्रणेला आहे.बेकरीवर हल्ला केलेल्या दोघांनी आपण झाकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित होऊन हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणेला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार दिला होता. २०१५ साली ऑस्ट्रेलियाने सिरुल अझहर उमर याच ताबा मलेशियाला देण्यास नकार दिला होता. त्याच कारणांच्या आधारे आम्हीही नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार देऊ शकतो, असे मोहम्मद यांनी म्हटले होते. भारतामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही, असे नाईक याचे म्हणणे असल्याचेही मोहम्मद यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकMalaysiaमलेशियाprime ministerपंतप्रधानEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय