अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:51 IST2019-04-16T16:51:23+5:302019-04-16T16:51:51+5:30

अब्दुल हफीज खान (४४) याला अटक केली आहे. 

Wife's slaying murder on suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

ठळक मुद्देमोहम्मद रकीब अब्दुल हफीज खान (४४) याला अटक केली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वत:हून पोलिसांना माहिती देत पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. मोहम्मदने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या हत्येची माहिती दिली.

मुंबई - अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कांदिवलीत एका भंगार विक्रेत्याने पत्नीची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हत्येनंतर आरोपीने स्वत:हून पोलिसांना माहिती देत पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मोहम्मद रकीब अब्दुल हफीज खान (४४) याला अटक केली आहे. 

कांदिवली येथील गांधीनगरमध्ये खान गल्ली परिसरात मोहम्मद पत्नी अजमतानुसी (४०), भाऊ - वहिनी व मुलांसोबत राहत होता. मोहम्मदचा भंगारचा व्यवसाय आहे. दुकानाच्या पोट माळ्यावर हे भाऊ आलटून पालटून झोपायचे. दोन वर्षापूर्वी मोहम्मद याचा नागपूर येथे भंगारचा व्यवसाय होता. मात्र, तेथे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तो दोन वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झाला. मुंबईत आल्यानंतरही मोहम्मद पत्नीवर संशय घ्यायचा. सोमवारी भाऊ-वहिनी मुलांसोबत पोट माळ्यावर झोपले असताना दोघांमध्ये खाली दुकानात वाद झाला. यावेळी मोहम्मदने अजमतानुसीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अजमतानुसी आरडाओरडा करू लागल्याने मोहम्मदने तिचे तोंड धरून गळा आवळत तिची हत्या केली. हत्येनंतर मोहम्मदने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोहम्मदला अटक केली. 

Web Title: Wife's slaying murder on suspicion of immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.