साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:20 IST2025-06-25T19:17:07+5:302025-06-25T19:20:18+5:30

पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Wife's photo appeared on Sadu's status; Husband reacted 'like this' when asked | साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

बिहारमधील बेगुसराय येथील एका विचित्र घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा फोटो साडूच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पाहिला आणि तो संतप्त झाला. पतीने जेव्हा याबद्दल पत्नीला विचारणा केली, तेव्हा पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाण झालेल्या पतीचे नाव अशोक महतो (रा. नागदह, वार्ड नंबर ११, बेगुसराय) असे आहे. त्याने आरोप केला की, "माझ्या पत्नीचे तिच्या बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध आहेत, म्हणूनच ती मला वारंवार धमकावते. इतकेच नाही, तर याला विरोध केल्यावर मेव्हणा आणि साडूने मला मारहाण करून गंभीर जखमी केले."

अशोक महतोने सांगितले की, त्याची पत्नी वारंवार तिच्या बहिणीच्या पतीसोबत व्हॉट्सॲप कॉलवर बोलत असते. एवढेच नव्हे, तर साडूने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आपल्या पत्नीचा फोटो लावला होता, ज्याला त्याने विरोध केला होता.

पत्नीचे अनैतिक संबंध आणि मारहाणीचा प्रकार
पीडित पतीने पुढे आपबिती सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी त्याची पत्नी तिच्याबहिणीच्या नवऱ्यासोबत व्हॉट्सॲपवर बोलत असताना त्याने पाहिले आणि त्याला विरोध केला. यावर संतापलेल्या मेव्हण्याने त्याच्याकडे आपले दोन हजार रुपये थकीत असल्याचे सांगितले आणि तेच निमित्त साधून त्याला मारहाण केली.

विरोध केल्यावर साडू आणि मेव्हण्याकडून मारहाण
अशोक महतोने सांगितले की, जेव्हा साडूकडून त्याला मारहाण झाली, तेव्हा त्याच्या मेहुण्यानेही त्याला मारहाण केली. अशोक महतो म्हणाले की, "माझ्या पत्नीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. माझ्या साडूचे घर जवळच आहे. कोणताही वाद झाला की, माझी पत्नी लगेच त्याच्या घरी पळून जाते. पत्नीला काही बोलल्यास साडू थेट आमच्या घरी येऊन मारहाण करतो आणि धमक्या देतो. यामुळेच माझ्या पत्नीचेही मनोधैर्य वाढले आहे आणि तीही मला धमकावत असते."

Web Title: Wife's photo appeared on Sadu's status; Husband reacted 'like this' when asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.