पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:33 IST2019-05-09T16:26:42+5:302019-05-09T16:33:44+5:30
पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली.

पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या
पिंपरी : पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. वंदना उत्तम जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उत्तम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा मेहुणा पुंडलिक वाघमारे याने या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम हा दारु पिऊन त्याची पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण करत असे. या दोघांमध्ये कायमच वाद होत होते. बुधवारी उत्तम दारू पिऊन घरी आला. त्यावेळीही त्याने पत्नी आणि मुलांना मारहाण केली. दरम्यान, रात्री उशिरा वंदना व त्यांची मुले झोपलेले असताना उत्तम याने वायरने पत्नीचा गळा आवळल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर वंदना यांना त्याने बेशुद्ध अवस्थेतच मोरीत ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो फरार झाला.
या प्रकारानंतर मुलांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी वंदना यांना रूग्णालयात दाखलही केले.मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तम जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
.............