Wife went mother house husband shocking steps kidnapped sister in law child Sahajanpur | १२ तासानंतर बेपत्ता ७ वर्षीय मुलगा सापडला, अपहरणाचं कारण वाचून व्हाल हैराण!

१२ तासानंतर बेपत्ता ७ वर्षीय मुलगा सापडला, अपहरणाचं कारण वाचून व्हाल हैराण!

यूपीच्या शाहजंहापूरमध्ये एका ७ वर्षीय मुलाच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने पोलिसांनी या अपहरणाचा खुलासा करत केवळ १२ तासात आरोपीला अटकही केली आहे.  आरोपीने सांगितले की, माहेरी गेलेली पत्नी परत यावी म्हणून त्याने नातेवाईकाच्या मुलाचं अपहरण केलं होतं.

७ वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नंतर पोलिसांनी सर्विलांसच्या मदतीने केवळ १२ तासात मुलाचा पत्ता लावून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलेल्या गोष्टींमुळे पोलिसही हैराण झाले. त्याने सांगितले की, पत्नीला परत मिळवण्यासाठी त्याने आपल्या मुलाचं अपहरण केलं. (हे पण वाचा : गिफ्ट डिलिव्हरीच्या बहाण्याने जाेगेश्वरीत डॉक्टरांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला, तिघांना अटक)

आरोपी दीपकने सांगितले की, त्याची २ वर्षाआधी लुधियानामध्ये तरन्नुमसोबत भेट झाली होती. दोघांनी पुढे लव्ह मॅरेज केलं. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे. साधारण काही महिन्यांपूर्वी तो परिवारासोबत सीतापूरला आला होता. ११ एप्रिलला छोटाश्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. अशात त्याची पत्नी न सांगता मुलाला घेऊन घर सोडून गेली. मी माझ्या पत्नी-मुलाला शोधत शाहजहांपूरला पोहोचला. आपल्या मेहुणीच्या घरात पत्नीला शोधले. नंतर मेहुणीच्या मुलाला आयस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तेथून बाजूला नेलं. माझी पत्नी न मिळाल्याने मी असं केल्याचं तो म्हणाला.

दरम्यान पोलिसांनी मुलाला त्याच्या परिवाराकडे सोपवलं आहे. तर आरोपीची रवानगी तुरूंगात केली आहे. एसपी संजय कुमार म्हणाले की, पोलिसांच्या सर्विलांसच्या मदतीने मुलाचा १ तासात शोध लावला गेला आणि आरोपीला अटक करण्यात आली. हे प्रकरण दोन परिवारातील होतं. आरोपीवर कठोर कारवाई केली जात आहे.
 

Web Title: Wife went mother house husband shocking steps kidnapped sister in law child Sahajanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.