बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातून राजा रघुवंशी हत्याकांडासारखाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे, पतीचा विरोध सहन न झाल्याने, पत्नीने प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत पतीचे नाव मनोज कुमार पासवान असे होते. तो बिहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीती नारायणपूर गावचा रहिवासी होता. त्याच्या पत्नीला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. तिचा प्रियकर अजय पासवान याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. तो शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजौली गावचा रहिवासी आहे. चौकशीनंतर दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
अवैध संबंधांतून हत्या -बिहिया पोलीस ठाण्याचे प्रमुख चंचल कुमार महथा यांनी दिलेल्या माहितीनुसरा, तपासात मनोज कुमार पासवान याच्या पत्नीचे आणि तिचा मामे भाऊ अजय पासवान यांचे अवैध संबंध होते. यासंदर्भात मनोजला माहिती मिळाल्यानंतर, त्याने विरोध दर्शवला. याच रागातून बुधवारी रात्री मनोजला फिरायला बोलावून गजराजगंज ओपी भागातील छोटकी सासाराम गावाजवळ त्याची हत्या करण्यात आली.
मठिया बंधाऱ्याजवळ सापडला मृतदेह -नारायणपूर येथील सूबेदार पासवान यांचा 35 वर्षीय मुलगा मनोज कुमार पासवान बुधवारी रात्री एक फोन कॉल आल्यानंतर घराबाहेर गेला होता. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह गजराजगंज ओपी भागातील छोटकी सासाराम येथील बंधाऱ्याजवळ आढळला. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, अवैध संबंधांमुळे घडलेल्या या क्रूर हत्याकांडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Bihar, a wife and her lover murdered her husband, Manoj Kumar Paswan, after he discovered their affair. The wife and her lover, Ajay Paswan, have been arrested. The murder occurred near Chhotki Sasaram village after a phone call lured the husband out.
Web Summary : बिहार में पत्नी ने प्रेमी के साथ मिलकर पति मनोज कुमार पासवान की हत्या कर दी। मनोज को अवैध संबंध के बारे में पता चल गया था। पत्नी और प्रेमी अजय पासवान गिरफ्तार। छोटकी सासाराम गांव के पास हत्या हुई।