पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:29 IST2025-09-13T13:28:54+5:302025-09-13T13:29:09+5:30

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आणि नंतर तिचे टक्कल केले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्या व्यक्तीने हे कृत्य केले.

Wife was shaved bald, poured petrol on her body and tried to burn her; As soon as the husband was arrested by the police, the woman started crying | पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया

पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली आणि नंतर तिचे टक्कल केले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्या व्यक्तीने हे कृत्य केले. ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील नगीना देहात पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पीडित महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

यानंतर, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली, परंतु नंतर पत्नी स्वतः तिच्या पतीला वाचवण्यासाठी पुढे आली. पीडित महिला तीन मुलांची आई आहे. पीडित महिला बधापूर शहरातील रहिवासी असून, तिचे लग्न १२ वर्षांपूर्वी नगीना देहात पोलस स्टेशन परिसरातील एका गावातील तरुणाशी झाले होते. काही काळापासून या जोडप्यात वाद सुरू होता.

महिलेने तिच्या पतीवर केला 'हा' आरोप 
बुधवारी रात्री महिलेला तिच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यानंतर ती महिला फोनवर बोलू लागली. तिच्या पतीने यावरून तिला मारहाण केली. त्याने तिला जाळण्याचा प्रयत्नही केला. यादरम्यान त्याने रेझरने तिचे टक्कलही केले. नगीनाचे पोलिस सर्कल ऑफिसर अंजनी कुमार चतुर्वेदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

या प्रकरणात पोलिसांनी काय म्हटले?
सीओने सांगितले की, नगीना देहात येथील एका गावात, तीन मुलांच्या आईच्या पतीने तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. त्याने तिचे रेझरने तिचे टक्कल केले. यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या कुटुंबाने तिला वाचवले. महिलेने गुरुवारी तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, शुक्रवारी या महिलेने पोलिसांना आपल्या पतीवर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली.

यानंतर, पोलिसांनी शांतता भंग करण्याच्या प्रकरणात आरोपी पतीवर गुन्हा नोंदवला. यानंतर त्याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या न्यायालयातून जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली.

Web Title: Wife was shaved bald, poured petrol on her body and tried to burn her; As soon as the husband was arrested by the police, the woman started crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.