बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 17:33 IST2022-09-12T17:32:33+5:302022-09-12T17:33:24+5:30

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली.

Wife was riding electric scooter with her boyfriend, husband recognized her from her dress and caught red hand video viral | बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये पती पत्नी आणि वो मधील हाय प्रोफाईल ड्रामा समोर आला आहे. एक महिला तिच्या बॉय फ्रेंडबरोबर फिरत होती, ईलेक्ट्रीक स्कूटरवरून ते दोघे एन्जॉय करत जात होते. तिने स्कार्फ गुंडाळला होता, तेवढ्यात पतीची नजर पडली. हायवेवर हा ड्रामा सुरु झाला आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला. 

पतीने तिचा पाठलाग सुरु केला. पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने याचा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. पती जोरजोरात ओरडत होता. पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबविली. पतीच्या आरडाओरडीमुळे तिथे गर्दी जमा झाली. या दोघांमध्ये मारहाणही झाल्याचे सांगितले जात आहे. 

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली. तसेच दोघांनाही पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा दिला आहे. या महिलेचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक मुलगी देखील आहे. तिचे प्रेमसंबंध तेथीलच एका तांदळाच्या व्यापाऱ्याशी आहेत, असे बोलले जात होते. 
पतीला तिचे बाहेर कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. महिला आज त्याला न सांगता घराबाहेर गेली होती. तिच्यासारखा ड्रेस दिसताच त्याने पाठलाग सुरु केला आणि रंगेहाथ तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले. या व्हिडीओमध्ये शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Wife was riding electric scooter with her boyfriend, husband recognized her from her dress and caught red hand video viral