पत्नी घेत होती फाशी; पती काढत होता व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 06:32 IST2022-10-27T06:32:05+5:302022-10-27T06:32:40+5:30

व्हिडिओ पाहून कानपूरमध्ये राहणाऱ्या महिलेचे पालक घरी पोहोचले. तेथे मुलगी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती.

Wife was hanging; The husband was making a video | पत्नी घेत होती फाशी; पती काढत होता व्हिडिओ

पत्नी घेत होती फाशी; पती काढत होता व्हिडिओ

कानपूर : पत्नी गळफास घेत असताना तिला त्यापासून परावृत्त न करता पती तिचे व्हिडिओ काढत राहिला, अशी धक्कादायक घटना कानपूर येथून समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने तो व्हिडिओ पत्नीच्या माहेरच्या लोकांनाही पाठवला.

हनुमंत विहार पोलीस स्टेशन परिसरातील गुलमोहर विहार येथील रहिवासी संजीव गुप्ता आणि राजकिशोर गुप्ता यांची मुलगी शोभिता यांचा विवाह १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झाला होता. या घटनेविषयी अधिक माहिती देताना गुप्ता म्हणाले, " लग्न झाल्यापासून पती आणि सासर हुंड्यासाठी त्रास देत होते. अत्याचार करत होते. २५ ऑक्टोबरला मुलीवर एवढा अत्याचार केला की तिने गळफास लावून घेतला. जावई संजीव व्हिडिओ बनवत राहिला. त्यानंतर त्याने व्हिडिओ आम्हाला पाठवला."

व्हिडिओ पाहून कानपूरमध्ये राहणाऱ्या महिलेचे पालक घरी पोहोचले. तेथे मुलगी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती. आई-वडिलांनी घाईघाईत मुलीला रुग्णालयात नेले. पण तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत महिलेच्या आईने तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Wife was hanging; The husband was making a video