पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:23 PM2021-10-11T21:23:31+5:302021-10-11T21:54:25+5:30

Murder Case : साथीदार फरार असून निजामपुरा पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 

The wife strangled her husband with the help of her accomplice | पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून केली हत्या

पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून केली हत्या

Next
ठळक मुद्देसविता संजय पागी ( वय ३५ ) तर अक्षय हरिचंद्र काळन ( रा . वडपा भिवंडी ) असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. संजय काशिनाथ पागी ( वय ३८ ) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.

नितिन पंडीत 

भिवंडीभिवंडीत पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, तिचा साथीदार फरार असून निजामपुरा पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 

संजय काशिनाथ पागी ( वय ३८ ) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर सविता संजय पागी ( वय ३५ ) तर अक्षय हरिचंद्र काळन ( रा . वडपा भिवंडी ) असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपी अक्षय हा सविता हिचा मानलेला भाऊ आहे असे आरोपी सविता नेहमी सांगत होती मात्र मयत संजय यास या दोघांवर संशय येत होता . त्यातच मयत संजय याने अक्षय यास घरी येण्यास मनाई केली होती तरी देखील अक्षय हा मयत संजय याच्या घरी नेहमीच येणे जाणे असायचे त्यावरून मयत संजय व सविता यांच्यात कडाडून भांडण व्हायचे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संजय व सविता यांच्या वाद सुरु असल्याचा राग अलायने अक्षयने सविता हिच्या मदतीने संजय याची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात सविता व अक्षय विरोधात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत संजय याची पत्नी सविता हिला पोलिसांनी अटक केली असून सोमवारी तीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर आरोपी अक्षय ह्या फरार असून निजामपूर पोलीस त्याचा शोध घेत असल्याची प्रतिक्रिया निजामपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी दिप बने यांनी दिली आहे . 

Web Title: The wife strangled her husband with the help of her accomplice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.