कुदळीने घाव घालून पत्नीची हत्या; मुलाला फाशी, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 08:35 IST2022-04-11T08:35:11+5:302022-04-11T08:35:25+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका माथेफिरूने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केली.

Wife stabbed to death Child hanged video goes viral | कुदळीने घाव घालून पत्नीची हत्या; मुलाला फाशी, व्हिडीओ केला व्हायरल

कुदळीने घाव घालून पत्नीची हत्या; मुलाला फाशी, व्हिडीओ केला व्हायरल

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) :

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे एका माथेफिरूने पैशांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाची हत्या केली. पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घालून ठार केले तर मुलाला झाडाला फाशी देत मारून टाकले. एवढ्यावरच त्याचे क्रौर्य थांबले नाही, तर त्याने दोघांच्याही हत्येचे व्हिडीओ व छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले व इतरांनाही पाठवले.

अक्षदा बलराज कुदळे (२८) व शिवतेज बलराज कुदळे (साडेचार वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. आरोपी बलराज दत्तात्रय कुदळे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा माथेफिरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. 
बलराज हा श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी येथे राहत होता. त्याचे आई-वडिलांशीही वाद होत होते. त्यामुळे पत्नी व मुलाला घेऊन तो दिघी व खैरीनिमगाव शिवारात असणाऱ्या शेतावर राहण्यासाठी गेला. आर्थिक कारणांवरून त्याचे पत्नीशी अनेकदा वाद होत होते. त्याला कंटाळून पत्नी काही काळ माहेरी निघून गेली होती. 

रविवारी सकाळी बलराज याने पत्नी काम करत असताना तिच्या डोक्यात कुदळीने घाव घातला. त्यात ती जागीच ठार झाली. यानंतर त्याने मुलगा शिवतेज याला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिला. मुलगा गतप्राण होईपर्यंत तो तेथेच थांबून राहिला. 

Web Title: Wife stabbed to death Child hanged video goes viral