कोथरुडमध्ये पत्नीचा चाकूने भोसकून खून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:16 IST2020-12-11T00:15:25+5:302020-12-11T00:16:58+5:30

Crime News : कौटुंबिक कारणावरुन पत्नीच्या कार्यालयात जाऊन तिचा खुन करण्याचा खळबळजनक प्रकार भर दुपारी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीत घडला.

Wife stabbed to death in Kothrud | कोथरुडमध्ये पत्नीचा चाकूने भोसकून खून  

कोथरुडमध्ये पत्नीचा चाकूने भोसकून खून  

पुणे - कौटुंबिक कारणावरुन पत्नीच्या कार्यालयात जाऊन तिचा खुन करण्याचा खळबळजनक प्रकार भर दुपारी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीत घडला. किर्ती रविकुमार पोटे (वय ४३) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव असून रविकुमार पोटे (वय ५०, रा. कोथरुड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दाम्पत्य कोथरुड परिसरात रहात असून त्यांना एक मुलगी आहे. किर्ती या एका हॉस्पिटलमध्ये स्वागतिका म्हणून काम करत होत्या. गुरुवारी पतीपत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरुन जोरदार भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्या घरातून कोथरुड बसस्थानकासमोरील हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती रविकुमार हाही तेथे आला. त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने पत्नीच्या अंगावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या किर्ती यांच्यावर तेथेच उपचार करण्यात आले. पंरतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. पत्नीवर वार केल्यानंतर रविकुमार हा पळून गेला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे अलकांर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी सांगितले.

Web Title: Wife stabbed to death in Kothrud