पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:04 IST2026-04-04T15:03:49+5:302026-04-04T15:04:24+5:30

पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांना विरोध करणे एका कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे.

Wife seen walking with lover, as soon as she asked, the opposite happened! Both of them hit the husband together | पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं

AI Generated Image

पती-पत्नीचे नाते हे सगळ्यात पवित्र बंधन मानले जाते. मात्र, या विश्वाच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांना विरोध करणे एका कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पतीने जाब विचारला असता, संतप्त प्रियकराने भररस्त्यातच त्या अभियंत्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, त्याने पिस्तूलच्या बटचा वापर करून पतीच्या चेहऱ्यावर वार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित कनिष्ठ अभियंता शुक्रवारी आपल्या पत्नीचा शोध घेत असताना त्यांना ती तिलका मांझी चौक परिसरात एका तरुणासोबत दिसली. समोर पत्नीला प्रियकरासोबत पाहून अभियंता थबकले आणि त्यांनी दोघांना थांबवून जाब विचारला. यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. देखते-देखता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने अचानक पिस्तूल काढून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

पत्नीचे ३ वर्षांपासून सुरू होतं प्रकरण

पीडित अभियंत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी मायागंज रुग्णालयात जीएनएम पदावर कार्यरत आहे. तर, आरोपी सुजित मंडल हा त्याच रुग्णालयात कंत्राटी डेटा ऑपरेटर म्हणून काम करतो. पत्नी आणि सुजित यांच्यात गेल्या ३ वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू असल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे. त्यांनी यापूर्वीही सुजितला पत्नीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती, मात्र सुजितने उलट त्यांनाच ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपी आपल्या कुटुंबातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचा धाक दाखवून त्यांना धमकावत असे.

बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

या हल्ल्यादरम्यान आरोपी सुजितने पिस्तूलच्या बटचा वापर करून अभियंत्याच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर वार केले. जबर मारहाणीमुळे पीडित गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. ते बेशुद्ध पडले असतानाही आरोपी सुजितने त्यांना मारहाण करणे थांबवले नाही. जवळच्या लोकांनी धाव घेतल्यानंतर सुजितने तिथून पळ काढला. उपस्थितांनी तातडीने जखमी अभियंत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पीडित अभियंत्याने बरारी पोलीस ठाण्यात सुजित मंडल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. 

Web Title : पत्नी प्रेमी संग दिखी, सवाल करने पर पति की पिटाई!

Web Summary : बिहार में पत्नी को प्रेमी के साथ देखने पर पति पर हमला। प्रेमी ने पिस्तौल से वार कर गंभीर रूप से घायल कर दिया। तीन साल से चल रहा था अफेयर। पुलिस आरोपी की तलाश कर रही है।

Web Title : Wife seen with lover, husband beaten after questioning them.

Web Summary : Bihar man assaulted after confronting his wife with her lover. The lover attacked him with a pistol, inflicting serious injuries. An affair of three years was revealed. Police are searching for the accused.